काय करता येइल...?
कधी जमेल..?
रोज रोज सकाळी आम्ही ठरवतो आणि खुप प्रयत्नही करतो....
आज वेळेवर पोहोचायचे... !!!!!
पण आजही (नेहमीप्रमाणेच) उशीर झालेला आहे.. !!!!!
.....तरी देखिल रस्त्यावर अचानक येणारे खड्डे, स्पीड ब्रेकर्स, पोटहोल्स, चुकविणार...
आणि बाजुच्या, समोरच्या गाडीवाल्यावर ओरडणार नाही (मनातल्या मनात सुद्धा).....!!!!!!!!!अगदी कृष्णाने सांगितल्याप्रमाणे स्थितप्रद्न्य वृत्तीने गाडी चालविणार आणि ऑफिस ला पोहोचणार..
......
या सगळ्या विचारांचे तीन तेरा कधीच वाजतात.....!!!
घरापासून १ किलोमीटर जात नाहित तोच मनात असंख्य राग, पुढे जाण्याची घाई, लाल सिग्नल ला सुद्धा गाडी पळवायाची वृत्ती, शिवराळ विचार (थोडक्यात शिव्या देण्याचे विचार) मनात डोकावू लागतात.. ...
भयंकर चुकीचे विचार डोक्यात थैमान घालू लागतात... खाऊ की गिळु नजरेने आम्ही अजूबाजूला पाहू लागतो...!!!
आणि मग जे व्हायचे तेच होते..!
राग, दुस्वास, इतरांची हेटाई करण्याची खुमखुमी...दिवस भर सतावत रहाते...!
----------
मग एके दिवशी आम्ही एक स्वप्न पाहतो...!!!!!
.....सुज्ञ, हुशार आणि भारतीय असल्याचा अभिमान बाळगून सरकारला आणि रस्त्यांच्या ठेकेदारांना शिव्या देऊन स्वताचा संपूर्ण दिवस खराब करून घेण्यापेक्षा उलटे केले तर..???
अगदी मुन्नाभाई एम्. बी. बी. एस. मध्ये बोम्मन ईरानी सारखे राग आला तर हसायचे असे जर आपण खड्यात गेलो तर हसायचे असे मनोमन ठरवले तर..??????..
खरेच जर असे झाले तर..????
प्रत्येकजन येणा-या प्रत्येक खड्ड्याला हसून सामोरे गेला तर..?????
महांपालिकेच्या दयेने सगळीकड़े मस्त खड्ड्याचे साम्राज्य आहे..!!!!
जेंव्हा तुम्ही रागात असता तेव्हा तुमचे २१९ स्नायू उर्जा वाया घालवतात, हृदय जोरात धडाडते आणि रक्तदाब वाढतो... हे सगळे टाळायला (स्वत:च्या खर्चाने स्ट्रेस थेरपी, डाऊन सिंड्रोम, खवळलेले पित्त. इ साठी) मेडिकल चाचण्या न करता फक्त एकाच केले तर..???
गाडी खड्ड्यात गेली रे गेली कि मोठ्ठा श्वास घ्यायचा आणि हसायचे..!
गाडी खड्ड्यात गेली रे गेली कि मोठ्ठा श्वास घ्यायचा आणि हसायचे..!
मी तर उद्यापासूनच ट्राय करणार आहे..???
बघू कित्ती जमते ते...!!!!
मनाला शांत ठेवायला..!!!!
:-)मनाला शांत ठेवायला..!!!!