मी ऑफिसमध्ये कामचुकार पणा का करतो..?

साधा माणुस...
दार वाजू लागले.. पण दिसत तर कुणीच नव्हते...
दुकानदाराला वाटले भास झाला असावा.. दार पुन्हा वाजले ..
मग त्याने खिडकीतून वाकून पाहिले तर एक धिप्पाड, मोठ्ठा, अल्सेशियन कुत्रा त्याच्या दुकानाचे दार ठोठावत होता..
त्याने त्याला लगेच हुसकून लावले....तरी पुन्हा तोच सीन.. 
कुत्रा त्याच्या दुकानाचे दार वाजवत होता.. मग त्याने नीट पहिले तर त्या कुत्र्याच्या तोंडात एक पिशवी होती.. 
दुकानदार त्या कुत्र्यापाशी आला तर कुत्र्याने ती पिशवी त्याला दिली...
पिशवी मध्ये एक कागद होता आणि त्यावर लिहिले होते,
"हा आमचा फेसबुक आहे, त्याच्या पिशवीत १ लिटर दुध, आजचा पेपर, एक ब्रेड आणि १ सुगारेत चे पाकीट द्या, पैसे पिशवीतच आहेत..."
बाजूलाच एक नोट होती... त्याला कुतूहल वाटले ..
त्याची सुद्धा दुकान बंद करायची वेळ झाली होती.. त्याने सगळे सामान पिशवीत ठेवले आणि गम्मत म्हणून त्या कुत्र्यामागोमाग चालु लागला..
कुत्र्या व्यवस्थित रस्ता क्रॉस करून दुस-या रस्त्याला लागला..
मग एक चौकातून उजवीकडे गेला,
लाल सिग्नल असल्यामुळे झेब्रा क्रोस्सिंग वर इतर लोकांबरोबर थांबला..
सगळेजण त्याच्याकडे कुतूहल मिश्रित नजरेतून पहात होते..
मग त्याने डावीकडून सिग्नल हिरवा होताच रस्ता क्रॉस केला आणि पुन्हा सरळ चालु लागला..

हा दुकानदार अजूनही त्याच्या मागे जात होता..
त्याचे आत्तापर्यंत असणारे कुतूहल आता जबरदस्त आदरयुक्त भावनेत बदलले होते..
इतका कॅनाक्ष आणि हुशार कुत्रा तो पहिल्यांदाच पाहत होता...
कुत्र्याच्या चाणाक्ष आणि हुशारीने तो खूप इम्प्रेस झाला होता..

 नंतर तो कुत्रा एका कॉलोनीमध्ये शिरला..
एका पाठोपाठ एक सारखी घरे ओलांडून तो एका भव्य मोठ्ठ्या दारापाशी आला..
त्याने त्याच्या तोंडातली पिशवी हळूच बाजूला ठेवली.. आणि दारावर धडाका द्यायला सुरुवात केली...
चार - पाच वेळा दारावर धडका मारून सुद्धा दार काही उघडेना...
... मग तो बागेत गेला, बागेच्या भिंतीवरून व्यवस्थित तोल सांभाळत तो खिडकी पाशी गेला..
खिडकी ला मग त्याने ४-५ वेळा धडका दिल्या आणि पुन्हा मेन दरवाज्यापाशी येवून उभा राहिला..
थोड्या वेळाने दार उघडले गेले....
एक मध्यमवयीन माणसाने दार उघडले आणि त्या कुत्र्याला काठी ने मारायला सुरुवात केली...
आश्चर्यचकित दुकानदार धावत धावत तिथे गेला आणि म्हणाला,
"आहो, आहो...., इतक्या हुशार आणि चाणाक्ष कुत्र्याला का मारत आहात..? 
कित्ती जिनिअस आहे  तुमचा हा फेसबुक... याला तर कोणीही न्यूजचानेल वाले आरामात फेमस करतील...त्याची हुशारी तर अजबच आहे..!!!!"
त्यावर तो मालक म्हणाला, "याला तुम्ही हुशारी म्हणता..???
आहो त्याला काडीचीही अक्कल नाही....!!!!
ही या आठवड्यातली तिसरी वेळ आहे हा नालायक मेन दरवाजाची किल्ली घरीच विसरून गेला..! नेहमी सांगावे लागते त्याला.. विसरभोळा आहे नुसता..!! काही कामाचा नाही..!"

**********
मतितार्थ: 
जिथे आपण काम करतो.. तिथे सुद्धा असे बरेच मालक (म्यानेजर) असतात जे आपल्यातील खरे गुण, हुशारी, काम पटापट उरकण्याची कला, कामाबद्दल असणारा आपलेपणा, कामाबद्दलची खरी कळकळ, ओढ,  या गोष्टी मुद्दाम दुर्लक्षित ठेवतात.. 
खूप क्वचितच मनापासून अप्रिशियेट करतात.. प्रोत्साहन, उमेद  देतात.. पण जर का चूक झाली तर ती कितीही लहान का असेना त्यावर लेक्चर मात्र लांब लचक देतात... मीच सांगतो ते कसे बरोबर, तेच करायला हवे, तुम्ही कामच कसे टाळता, उशिरा कसे येता, इ. इ...
     आपले दुर्दैव म्हणजे असे खाष्ट, कडक, अतिशय काटेकोरपणे नियमावर बोट ठेवणारे म्यानेजर ९०% आहेत..  आणि तिथेच लोकांची प्रोडक्तिविटी, सीनसियरीटी, काम करण्याची इच्छा आपोआपच कमी होते.. आणि ते फक्त पाट्या टाकायची कामे करू लागतात... कामचुकारपणा वाढतो..
पण जिथे १०% चांगले म्यानेजर आहेत तिथे याच्या उलट स्थिती असते..! सगळे आनंदाने काम करताना दिसतात...
    आम्हाला प्रश्न पडतो.. 
जर हे ९०% म्यानेजर खरेच हे म्यानेजर लोक जर का थोडेसे प्रेमाने वागले, कामात व्यवस्थित मोटिवेशन दिले, ठीक आहे चुका झाल्यात तर होऊ देत पण पुढे जरा खबरदारी घ्या आणि चुका न होण्याची काळजी घ्या.. असे साधे सोप्पे सिम्पल आपलेपणाने का वागू शकत नाहीत..?  
काय कारण असेल..?