ऍफिलीएट मार्केटिंग म्हणजे टाईम वेस्ट..!!!

साधा माणुस...

ऍफिलीएट मार्केटिंग म्हणजे टाईम वेस्ट.??

 नमस्कार दोस्तांनो,

 ईमेल सोशल मीडिया वरून मला खूप वेळा विचारणा होत राहिली कि या कोविड लॉकडाऊनमध्ये जेंव्हा घरी बसून आहोत तर काही उपाय सांगा कि आमची जरी वेबसाईट नसेल तरीही आम्ही कंपलसरी / नियमित पैसे कसे कमावू शकतो...!!

चला तर आज पाहुयात...!!

प्रथम हे पाहुयात कि ऍफिलीएट मार्केटिंग म्हणजे नेमके काय ...! 

नव्वदच्या दशकात जवळ जवळ १९९५ पासून ते पुढील १० वर्षे इंटरनेटवरील बऱ्याच महाभागांनी इतर शिकू इच्छिणाऱ्या होतकरू लोकांना चांगलेच गंडवले... ते कसे तर "इंटरनेटवर आरामात पैसे कमवा" अशी जाहिरातबाजी भर भरून केली...

 

फक्त भारतातच नाही तर सगळीकडे साऱ्या जगात तसे चालू होते.. असे काही डिजाईन विकणाऱ्या लोकांनी त्यांच्या माध्यमातून मात्र भरापूर पैसे मात्र कमावले ...

लोकांना आपण फसवले गेलो आहोत समजेपर्यंत वेळ मात्र खूपच निघून गेली होती ..

त्यांनी पैसे तर कमावले पण ज्यांनी पैसे घालवले ते मात्र खूपच भावून होऊन मनाला लावून घेतले... स्वतःला वाईट बोलत राहिले कि आपल्यालाच जमत नाहीये ... मला येतच नाहीये हे  करायला,

मग अश्यानी इतरांना सांगायला सुरुवात केली,

"भावांनो, लांब राहा या भुलभुलैय्यापासून ... काही पैसे बीसे नाही मिळत...उगाच येडे बनाल.. कारण आम्ही बनलो ना..! "

त्यामुळे झाले काय, नवीन येणारी पिढी होती ती भांबावून गेली .. संशयी बनली .. स्केप्टिकल होत गेली ...!!

त्यांना किंवा सर्वसामान्यांना हेच मनावर ठसत राहिले कि "इंटरनेट वर चांगल्या मार्गाने पैसे कमावताच येत नाही .."

 म्हणजे जसे कि शेअर मार्केटचे झालेले अगदी तसेच... 

काही लोक स्वतः कोणताही अभ्यासाचा भार ना उचलता, - हजार रुपये भरून रोज येणाऱ्या टिप्सला भाळून पैसे लावतात .... कधी कधी नफा होतो ... पण तोटा झाला रे झाला कि भाजून निघतात मग शेअर मार्केटला शिव्या देऊ लागतात म्हणतात कि 

"शेअर मार्केट पासून लांब राहा ...."भावांनो, लांब राहा या भुलभुलैय्यापासून ... काही पैसे बीसे नाही मिळत..."

 तसेच हे लोकही सगळीकडे फैलावतात कि इंटरनेट वर पैसे कमावणे म्हणजे टोटल स्कॅम आहे रे बाबा ... दूर रहा बरे... !!! . .

...

गम्मत म्हणजे "नॉर्मल लोक" (जे रोज 9 ते 7 काम करतात ते लोक असे वाचावे) आजही हेच समजतात कि इंटरनेट वर ऑनलाईन काम करून पैसे कमावणेच शक्य नाही ..!

 कितीही शिकलेले असोत, इंजिनियर असो, डॉक्टर असो, एम.बी. कलेले असोत, भारताबाहेरून शिकून आलेले असोत .. सर्वजण आजही "ऑनलाईन पैसे कमावणे" या विषयाला जरा दचकूनच वावरतात ...

इतकेच नाही, जर तुम्ही त्यांना सांगितले, कि मी "ऍफिलीएट मार्केटिंग करायचा विचार करतो आहे" तर ते भूत पाहिल्यागत पाहतात तुम्हाला त्यापासून परावृत्त करायचा सर्वतोपरी प्रयत्न करतात ... आई वडिलांपर्यंत सुद्धा पोहोचतात त्यांना समजावतात कि याला / हिला समजावा ... ऍफिलीएट मार्केटिंग पासून लांब राहा काहीतरी सॅलरी मिळेल असा जॉब शोध ...

(जॉब ....पण आता तेही नॉर्मल राहिलेले नाहीये... नवीन जॉबचं काय परमनंट नोकऱ्याही जात आहेत आजच्या काळात पुढील - वर्षे तरी काहीच सांगता येत नाही ...)

 आपल्या रोजच्या आयुष्याचं उदाहरण पहा ना ..

रोजच्या व्यवहारामध्ये इंटरनेट चे महत्व किती आलेले आहे .. कोव्हिडने तर त्यावर एक मोहोरच उमटलेली आहे...

1. रस्ता चुकत नाही कारण गुगल मॅप्स..

2. मोबाईल खरेदी करायचा आहे, जा इंटरनेटवर..

3. ईमेल, फेसबुक, व्हाट्सअप, इंटा, ट्विटर याशिवाय जगणे तर आजच्या तरुण पिढीला जवळ जवळ अशक्यच आहे ..... 

नाही का..? 

बर १४ ते २५ वर्षे वयोगट जरा बाजूला ठेवूयात ...

अन मध्यमवयीन पिढीही पहा...पहा नाकिराणामालापासून ते इलेकट्रोनिक गॅझेट्स पर्यंत 85% वस्तू आपण ऑनलाईनच मागवत आहोत ..!!!

गुगल ने केलेल्या सर्वेनुसार प्ले स्टोअरवर १,२५,००० नवीन ऍप्स रोज रोज येत आहेत..!! एका सर्व्हेनुसार, भारतात हे "ऑनलाइन खरेदीचे प्रमाण" फक्त ५४% आहे ... पुढील 2-3 वर्षांमध्ये ते ७८ते ८२% पर्यंत नक्कीच वाढेल ..! 

 तर मतितार्थ असा आहे कि आपण लवकर बदल स्वीकारत नाही ... आजच्या काळात याचे प्रमाण फारच वाढलेले आहे ...

 

"जे लोक जे बदल स्वीकारत नाहीत ते फारच लवकर आऊटडेटेड होतात .." - श्री वॉरन बफे 

 

तुम्ही पाहिले किंवा वाचलेच असेल, मोठे मोठे बिजनेसमॅन, सेलेब्रिटी, कंपन्या आज इंटरनेटवर स्वतःचा प्रेझेन्स दाखवायला किती धडपडत आहेत ते ..  संपूर्ण जगभरात स्वतःची छाप पडायला चढाओढ लावत असतात ...

 टिकटॉक चे उदाहरण घ्या,  - 3 वर्षातील कमाई 3,000 कोटी ..

त्यातले 30 कोटी त्यांनी पंतप्रधान योजनेत मागच्या वर्षी डोनेशनही दिले होते ..!! 

(प्रूफ पाहण्यासाठी गूगल करावे !!)

 पेटीएम चे उदाहरण घ्या..

88 - 89 वर्षीय असलेले, जागतिक फायनान्स गुरु, तसेच जगातील श्रीमंतांच्या यादीत पहिल्या पाच मध्ये असलेले श्री.वॉरेन बफे...त्यांनी ऐकल्या पुढच्या हाका भारतातील पेटीएम मध्ये मिलियन्स डॉलर मध्ये कधीच इन्व्हेस्टमेंट केलेली आहे .. !!!!

....

आजचा जगातील सर्वात श्रीमंत, फोर्ब्स च्या यादीतील नंबर कोण आहे पहा बर जरा ....?

बरोबर ...त्याचे नाव आहे .. जेफ बेझोस...! ऍमेझॉन या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन कंपनीचा मालक ... 

कंपनी किती जुनी आहे ..? १९९६ ते २०२० - फक्त २४ वर्षे झालीत ...

जगातील पहिल्या १० श्रीमंतांच्या यादीत त्यांनी आपले स्थान - वर्षांपासूनच बनवलेले आहे ..!

तर पैसे कमावण्याचा एक मंत्र मी जो या मोट्ठ्या लोकांकडून शिकलो तो आहे कि

- "जितक्या लवकर तुम्ही पैसे कमावण्याचे नवीन चांगले मार्ग शिकाल, तितक्या लवकर तुम्ही पैसे कमावण्याच्या मार्गात इतरांच्या पुढे असाल ..!"    

अनुभव नसणाऱ्या इंटरनेटर नवीन येणाऱ्या लोकांसाठी जर कोणते बिसनेस मॉडेल सर्वात उत्तम असेल तर ते आहे ऍफिलीएट मार्केटिंग बिजनेस मॉडेल...!!!!

 काय...???

काय म्हणालात ..???

 तुम्ही म्हणाल कि सुरुवातीला मी म्हणालोय कि - "ऍफिलीएट मार्केटिंग म्हणजे टाईम वेस्ट आहे ..!"

सत्य परिस्थिती ही आहे कि माझं पूर्ण वाक्य हे आहे -

ऍफिलीएट मार्केटिंग म्हणजे टाईम वेस्ट आहे .... जर ... तुम्ही ते मधेच सोडून द्याल तर... जर तुम्ही स्वतः त्यावर ज्या वापरल्या पाहिजेत त्या स्ट्रॅटेजी वापरता "फक्त उथळ गोष्टींवर लक्ष केंद्रित करीत राहिलात तर"...!!!

 पुन्हा एकदा सांगतो कि - ऍफिलीएट मार्केटिंग ही काही "गेट रिच क्विक स्कीम" नाहीये .... आरामात पैसे कमवा असे तर अजिबातच नाहीये ..!!

 पण एक गोष्ट नक्की आहे कि - या बिजनेस मॉडेल मध्ये तुमच्यासाठी जबरदस्त पोटेन्शल दडवून ठेवलेले आहे....!!!!

 सर्वात महत्वाची गोष्ट जी कोणती असेल ती हि आहे कि - तुम्ही लावून धरले पाहिजे .. तुमच्यात पेशन्स असायला हवा ... रिझल्ट तेव्हाच मिळतो जेंव्हा तुम्ही  थकता, घाई करता सर्व सांगितलेल्या गोष्टी करत राहाल ...!!

रेल्वेचे इंजिन सुरुवातीला खूप आवाज करते .. पण एकदा का स्पीड मिळाला, इंजिनाला मोमेंटम मिळाले कि मग आरामात ते 4 - ५० किलोमीटर एकही थेम्ब डिझेल वापरता सुद्धा जाऊ शकते..!!!

 

मुमेंटम मिळेपर्यंत तुम्हाला थांबायची सवय मात्र हवी ... तरच यश मिळायचे चान्सेस असतात ...  

 

तुम्हाला कॉम्पुटर प्रोग्रामिंग, जावा, वेब, अँड्रॉइड डेव्हलपमेंट, , , काही नाही आले तरी चालेल ... ते जास्त महत्वाचे नाही.. !!! काही लोक सुरुवात तर करतात एकदम जबरदस्त ... पण मग ते दर आठवड्याला धरसोड वृत्ती प्रमाणे नवीन नवीन गोष्टी ट्राय करत राहतात ... एकच लावून धरणे त्यांना अवघड जाते... त्यांना लगेच पैसे हवे असतात ..!!!

जेंव्हा आपण जॉब करतो तेव्हा महिन्याला सॅलरी मिळते ... पण ते हे विसरतात कि ती सॅलरी यायला आपण आयुष्याचे किती वर्षे अभ्यास करण्यात व्यतीत केलेले आहेत ..!!!!

आपण प्रत्येकजण जवळ जवळ १० ते १६ वर्षे शाळा, कॉलेज शिकत असतो....

मग प्रोजेक्ट ...

पण तरीही लगेच जॉब मिळेल असे नसते ...

१६ वर्षे शिकल्यानंतर पुन्हा इंटरव्ह्यू द्या ... चकरा मारा ...

 ऍव्हरेज मार्क वाल्यांचे हाल तर खूपच वाईट असतात ...

इतके सगळे केल्यानंतर एकदाचा तो जॉब मिळतो ज्यात आपण मग कुठे १० - १२ तास आयुष्याचे रोज देत असतो ...!!! तिथेही सॅलरी महिन्याची फिक्स असते ... सिनियर ला खुश करायला नाना तर्हेचे पॉलिटिक्स लोक खेळतात .. सुट्टी घ्यायची असेल तर हातपाय पडायला लागतात .. जॉबच्या ठिकाणीही लोक खुश आहेत असे नाही ...!!! आता तर जॉबची शाश्वती राहिलेली नाही..!!  

मग मला सांगा - 

याच ऍफिलीएट ऑनलाईन मार्केटिंग  क्षेत्रातून लोकांना का असते अपेक्षा कि काम सुरु केल्या केल्या लगेच पैसे मिळायला हवेत ...?

1. त्यातले क्वालिटीवर्क शिकला आहात ...?

2. त्या क्षेत्रातल्या हार्डवर्किंग, स्मार्टवर्किंग स्टेप्स समजून घेतल्यात ..?

3. स्वतः इम्प्लिमेंट केल्यात ?

4. पक्के कच्चे दुवे अजून माहिती केलेत?

 एकूणच त्या क्षेत्रात अजून हातखंडा मिळालेला नाही तरी पैशाची अपेक्षा लगेच ...?

हे चुकीचे नाही काय ...??

त्यामुळे ज्यांना कुणाला या क्षेत्रात यायचे असेल त्यांनी कृपया हे लक्षात ठेवावे कि :-

1. हे क्षेत्र सुद्धा तितकेच काम करण्यालायक आहे ....

2. तितकेच हार्डवर्किंग आहे ...

3. तितकेच चॅलेंजिंग आहे ...

...

..

.

अन पैसे ?

.. 

फक्त हे लक्षात ठेवा कि - 

या क्षेत्रात टिकून राहिलात तर इंटरनेट हि एक तुम्हाला पैसे देणारी भक्कम संस्था आहे ..!!!!!! दुभती कामधेनूच म्हणा ना ...!

अलिबाबाच्या गुहेप्रमाणे तुम्हाला फक्त पासवर्ड शोधून वापरता आला पाहिजे ... तिळा तिळा दार उघड...!!!!! 

मग तुम्ही जिथे पाहाल तिथे तुम्हाला सोन्याची, पैशांची खाणंच दिसेल जी जॉब मध्ये कधीच शक्य होत नाही .. !!

 मग आता पहिल्या वाक्यात असे सांगता येईल कि ऍफिलीएट मार्केटिंग म्हणजे "टाईम इनवेस्ट" आहे...!

 त्यासाठी व्यवस्थितपणे अभ्यास योजनापूर्वक तयारी करावी लागते ...

 आता तुमच्या साठी खुशखबर आहे ...

तुम्हाला वेबसाईट शिवाय सुद्धा ऍफिलीएट मार्केटिंग करता येते हे माहीत आहे काय ..?

तुम्हाला काहीही गरज नाही प्रोग्रामिंग शिकायची ... तसेच कोणताही ब्लॉग असण्याची सुद्धा गरज नाहीये...

:-)

माझ्या पुढच्या लेखात मी त्यावर बोलेन ...

तोपर्यंत काही सक्सेस मंत्र टिप्स देतो:-

. असे क्षेत्र निवडा ज्यात तुम्ही एक्स्पर्ट आहात तुम्हाला त्यावर कधीही बोलायला, लिहायला आवडते .. तुमची रोजची ऍक्टिव्हिटी तुमच्या प्रोफेशनमधील असो कि तुमच्या आवडीची... 

उदा. समजा तुम्ही डॉक्टर आहात तर तुम्ही तुमच्या एक्स्पर्ट फिल्डबद्दल म्हणजे डायबिटीज, औषधे, हेल्थ, वेटलॉस वगैरे बद्दल बोलू शकता ...

जर तुम्ही बँकर आहात तर तुमचे क्षेत्र असू शकते इन्व्हेस्टमेंट किंवा फायनांशियल मॅनेजमेण्ट, , ..    

(गम्मत सांगतो अमेरिकेत 12 - 14 वर्ष्याच्या मुलांनी व्हिडियो गेम्स खेळण्यांमध्ये ऍफिलीएट मार्केटिंग द्वारे लाखो डॉलर्स कमावले आहेत..!!)

 

हा आहे अमेरिकेतील रयान काझी (Ryan Kaji) ... वय वर्ष दहा फक्त .. 

ऑक्टोबर 2023 अपडेट :- (सध्या तो 14 वर्षांचा आहे ) त्याच्या चॅनल ला 4 कोटी हून अधिक लोक रोज पहतात !!!

गेल्या तीन वर्षांपासून या वर्षीचाही जगातील नंबर एक वर असणारा युट्यूब हिरो ... (https://www.youtube.com/channel/UChGJGhZ9SOOHvBB0Y4DOO_w)

 मागील वर्षाची कमाई २६ मिलियन डॉलर्स (भारतीय २०२ करोड रुपये फक्त)  … त्याच्या चॅनेल चे स्बस्क्रायबर  कोटी ३० लाखाच्या वर आहेत ...

 . भावना या नेहमी डोक्यालिटीहुन जास्त महत्वाच्या असतात ... दुसर्या भाषेत सांगायचे तर असेही युट्यूब चॅनेल आहेत ज्यांचे स्बस्क्रायबर लाखांच्या वर आहेत त्यांचा सब्जेक्ट  आहे "मांजर त्यांची पिल्ले" ...  तर "आयुष्य बदलणाऱ्या टिप्स" सारख्या चॅनेल्स चे स्बस्क्रायबर फक्त काही हजारातच आहेत ..!!!!

या क्षेत्रातील गोल्डन सोनेरी नियम एकच - "भावनांचा हिंदोळा" ..!!

 

. त्रिसूत्री नेहमी लक्षात ठेवा - रिसर्च, रिसर्च फक्त रिसर्च... इथूनच तुमची प्रतिमा दर्जेदार बनते किंवा बिघडते...  प्रथम इम्प्रेशन हेच शेवटचे इम्प्रेशन असते हे इंटरनेट मार्केटिंग मध्ये अगदी १००% खरे आहे... 

त्यामुळेच जे काही कराल ते सर्व रिसर्च केल्यानंतरच सर्वोत्तम माहिती घेऊनच करा... मीही तेच करतो - माझे वाचक त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवतात..!

तुमचे रीडर, स्बस्क्रायबर, फॉलोअर यांना नेहमी खरी माहिती द्या त्यांच्याशी नेहमी प्रामाणिक राहा .. कारण त्यांचा विश्वास संपादन करणे हेच तुमच्या ऍफिलीएट मार्केटिंग मधील यशाचं गमक आहे ...!!!

पुढच्या पोस्ट मध्ये मी तुम्हाला सांगेन:- 

१. ब्लॉग, वेबसाईट नसतानाही ऍफिलीएट मार्केटिंग कसे करता येते...

२. इंटरनेटवर ऑनलाईन मार्केटिंग करताना लक्षात ठेवायच्या सोप्प्या गोष्टी .. 

३. शून्यातून स्वतःचा ऑनलाइन बिजनेस कसा करावा.. 

४. तुम्ही जर ते आधीपासूनच करत असाल तर तुमचे आणखीन व्हीव्हर्स म्हणजेच ट्रॅफिक कसे वाढवावे.. 


जर तुमच्या जुन्या व चुकीच्या अवघड सवयी सुटत नसतील ज्या तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा नेहमीच निर्माण करतात..  तर त्या सोडवायच्या असतील तर ही पोस्ट वाचा... व मोफत पुस्तक मिळवा .