"...खरंच बापू तुमचा देश खुप तरक्की करतोय...."

साधा माणुस...

 "...खरंच बापू तुमचा देश खुप तरक्की करतोय......"

--------------------------------C/o TM - ०२-ऑक़्टोबर-२०११ 

तुम्ही तीन गोळ्या खाल्ल्या,
मागासलेल्या काळात...!

इंदिराने शेकडो गोळ्या झेलल्या, 
खलिस्तानवादाच्या काळात...! 

राजीवला तर मानवी बॉम्बनेच उडविले,
एल.टी.टी.ई च्या काळात...!

खरंच बापू तुमचा देश खुप तरक्की करतोय..

खून के आखरी बूँद तक देश के लिए लढुंगी,
इंदिराचे भावनिक आवाहन लगेच मनावर घेतले आम्ही...
बापू तुम्ही सांगितलेला 'खरेपणाने वागा' मन्त्र 
अशा रितीने पूर्ण केला आम्ही...!. 

इंदिराने खाल्ल्या शेकडो गोळ्या,
पण अजुनही लाखो इंदिरा
देशात जागोजागी होताहेत होळ्या....! 

जन्मण्यापुर्वीच खुडल्या जाता आहेत, 
हजारो मासूम निष्पाप कळ्या..!!

त्यांना बिचा-यांना वाचवायचे कुणी..?
राजाराम मोहन रॉय नाहित...
सावित्रीबाई फुले नाहित... 
आणि धोंडो कर्वे, तुम्ही ही नाहीत..!! 

खरंच बापू तुमचा देश खुप तरक्की करतोय..

तुमचा काळच बापू तसा,  
खुप मागासलेला होता, 
दिवाळीतसुद्धा फटाक्यांचा 
कमीच शोर होता,    
पिस्तूलच काय रिव्हालवर ला आता,
कुणीच विचारत नाही, 
ए.के. ४७, ए.के. ५६ शिवाय,
कुणीच बोलत नाही..! 

आर.डी.एक्स तर इथला परवलीचा शब्द झालाय, 
करोड़ों रुपयांचा भ्रष्टाचार सुद्धा,
कॉमन मॅनच्या बधिर उदासिनातेला, 
धक्के देइनासा झालाय...!   

फाटका, गरीब, भिकारी
फाटक्या झोळीतच अडकतोय,  
तुम्ही सांगितले गरीबी हटाव, 
आम्ही गरीबांनाच हटावतोय..!  

खरंच बापू तुमचा देश खुप तरक्की करतोय..

तुमच्या काळात सायकलवर लोक,
अभिमानाने संसदेत जात होते,  

आज तिथेच पार्किंग मधे
बी.एम्.डब्ल्यू , ऑडी, लेक्सस,
दिमाखात उभी राहते..!

विकास करण्या इथे कधीच, 
एकी होत नाही,  

पगारवाढ पाचपट करण्या
बेकी होत नाही..!    

बदलली नाहिये जेवणाची 
संसदेतली जुनी सिस्टीम... 

६ रुपयात चिकन चापायचे,
१० रुपयात मटन हणायाचे...!!

आम्हाला मात्र ६ रुपयात,
चाय कम पानी ज्यादा, 

मिलावटी दूध .. 
अन..
नुसतीच कटिंग...!!!

______________________
जमीर इब्राहीम 'आझाद'