जाणून घ्या कधी आहे? IPL 2024 Auction Price- IPL Mini Auction
Cricket ipl 2024 |
दरवर्षी जबरदस्त धमाल घेऊन येणारी, क्रिकेट मधील सर्वात मोठी स्पर्धा म्हणजेच IPL(Indian Premier League)
IPL 2024 साठीच्या टीम पुढील महिन्यात निवडण्यात येईल ..
यामध्ये कुणाला कुणी घेतले आणि कुणी कुणाला नारळ दिला हे समजेल ...
जसे मी आम्ही पूर्वी येथे लिहिले की तो दिवस दूर नाही जेंव्हा क्रिकेट हा एक खेळ न राहता एक सट्टा होईल आणि खेळणारे प्लेयर्स यांच्यावर लोक बोली लावतील !!!!!
त्याचप्रमाणे आज घडताना दिसत आहे !!!!
सट्टेबाज त्यांच्या खिशाला पाहून जोरदार बोली लावतात आणि हा खेळाडू घेतला म्हणून जाहीर करतात ...
पूर्वीचे आपल्या देशासाठी खेळायचे दिवस भूतकाळात जमा झाले आणि आता उरलाय तो झकास बाजारूपणा
काळ बदलला तसे entertainment ला जास्त महत्व आले ... देश-बिश, क्लासिक गेम वगेरे काही नाही, क्रिकेट मध्ये पैसा वसूल मजा यायला हवी... हा आजचा परवलीचा शब्द आहे !!!
फुटबॉल प्रमाणे यातही entertainment च्या नावाखाली पोरी नाचवतात हे दिसतेच ...
आता ते चांगले की वाईट हे विचारायची सोय राहिलेली नाही !!!!
सगळं इवेंट प्रमाणे झाले आहे आणि गंमत म्हणजे सट्टेबाज, सटोडिया, गेमर्स, पैसेवाले यात बक्कळ पैसा कमवतात ..
कॉमन मॅन च्या खिशातून जो पैसा जातो त्याची तर मोजदादच नाही !!!!
महागडे तिकीट,
गाडी लावायला पार्किंग (तेही राम भरोसे आणि तात्पुरतेच असते)
स्वत: बरोबर खायला प्यायला घेऊन जायचे नाही,
आत खायला प्यायला मिळणाऱ्या वस्तूंचे रेट 200 च्या पुढेच ... (समोसा असो की पॉपकॉर्न की कोल्डड्रिंक)
सगळ्या मॅच पैकी किती खऱ्या आणि किती फिक्सिंग आहेत ते सुद्धा आपल्याला माहीत नसते)
कॉमन मॅन म्हणून आपल्याला त्या मॅचचा काय उपयोग होतो हा प्रश्न गैरलागू ...
तर असो, ज्याचा त्याचा प्रश्न आहे ... 20 रुपयांची पाण्याची बाटली 200 रुपयाला घ्यायची की नाही ते !!!!
मॅच पाहायला जाणारे याचा विचार करत नसतात !!!!!
तर मित्रांनो पाहुयात आपल्याकडे काय नवीन खबर आहे !!!!
मिनी ऑक्शन ची तारीख
19 डिसेंबर 2023
ऑक्शन आयोजन
भारताच्या बाहेर
आयोजन स्थळ
दुबई कोका कोला अरीना
खेळाडूंची शेवटची तारीख:
26 नोव्हेंबर 2023
सैलरी पर्स मध्ये जास्त टाकलेले पैसे
100 करोड़ रुपये
सगळ्यात जास्त सैलरी पर्स
पंजाब किंग्स – 12 करोड़ रुपये
सगळ्यात कमी सैलरी पर्स
मुंबई इंडियंस – 50 लाख रुपये
आईपीएल मिनी ऑक्शन कधी होणार ?
बहुतेक करून डिसेंबर मध्ये होईल, वेबसाइट क्रिकबज च्या रिपोर्ट प्रमाणे 19 डिसेंबर असेल !!!
दुबई मध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या या मिनी ऑक्शन मध्ये आणखीन काय काय होणार ते अजून तरी गुलदस्त्यात आहे !!
सगळ्यात जास्त सैलरी पर्स?
मागच्या सीजन मध्ये पंजाब किंग्स चे सर्वात जास्त म्हणजे 12 करोड़ रुपये होते ...
आणि चैंपियन मुंबई इंडियंस कडे सगळ्यात कमी 50 लाख रुपये होते
यावेळी कोणाकडे किती असतील हे पाहण्यात खरी मजा आहे !!!!
पुढील पोस्ट:-