दसरा - दिवाळीत कोणत्या शस्त्राची पूजा केली तर चोहिकडून आनंद, आरोग्य व संपत्ती येऊ शकते?

साधा माणुस...

दसरा हा सण निव्वळ धार्मिक नाही तर माझ्या मते पुरुषार्थाशी जोडला गेलेला आहे. 

त्यामुळेच की काय ‘सीमोल्लंघन’ही संकल्पना याच दिवशी निर्माण झाली असावी. 

खरे पाहता सीमोल्लंघन करायचे म्हणजे काय करायचे? 

तर ‘सत्’वर विजय मिळवायचा. 

रावण वध हा सांकेतिक असेल; पण त्या निमित्ताने ‘असत्’चा पराभव करायचा, हे सूत्र सांगितले गेले आहे.

तसेच 

महावीर असे पांडव कुरुक्षेत्रावर होते आणि अर्जुन त्या कुरुक्षेत्राचा नायक होता; 

पण एक विचार केला तर कुरुक्षेत्र निव्वळ बाहेर आहे का? 

ते जसे बाहेर आहे तसे किंवा त्याहूनही जास्त मोठा चक्रव्युव्ह असलेले कुरुक्षेत्र मनामध्ये देखील आहे. 


त्या बाहेरच्या कुरुक्षेत्रावर विजय मिळवणे एकवेळ कदाचित सोपे असेल; 

पण मनातल्या कुरुक्षेत्रावर निर्माण झालेल्या विविध छळणाऱ्या संभ्रमातून बाहेर कसे पडावे ?


ईसराईल अन फिलीस्तिन  (हमास) मधील ६० वर्षं जुने सुरू असलेले युद्ध पाहिलेत ना?

15 हजाराहून जास्त फिलीस्तिन जनता जीवाला मुकली आहे ...तर ईसराईल चे 2100 लोक मारले गेले आहेत ... जगाच्या पाठीवर कुठेही असो युद्ध हे चुकीचेच !!!!

 युद्धाचे निर्णय घेणारे राजकारणी लोक नामानिराळे राहतात अन नुकसान होते ते सर्वसामान्य जनतेचे ... गेलेले जीव पुन्हा येत नाही अन जखमा भरून निघत नाहीत ... 

सगळयात कठीण जे आहे ते म्हणजे सत्यावर चालताना, न ढळता  पंचेंद्रियांवर विजय मिळविणे व तो मिळवितानाच कोणत्याही मोहामध्ये न अडकणे

पांडवांमधे जो पार्थ - म्हणजे अर्जुन आहे, तर त्यालाही भयंकर संभ्रम पडलेला आहे. 

आपलेच नातलग - काका, मामा, भाऊ यांना समोर पाहिल्यानंतर त्याचे धनुष्य उचलायचे गडबडले आहे. 

यांना मी कसे मारू, ते बरोबर आहे काय? असा प्रज्ञावाद अर्जुनाच्या मनात साहजिकच निर्माण झाला आहे. म्हणूनच तिथे श्रीकृष्णाची गरज आहे. 

*‘तुझे कर्म तू शुद्ध मनाने कर!’* एवढया एका वाक्यात सगळया गीतेचे १८ अध्याय सामावलेले आहेत.!!

.. अर्जुनाचे या एका साध्या दिसणाऱ्या वाक्याने सगळे संभ्रम दूर झालेले दिसतात का ? 

या एका वाक्याने त्याला ज्ञान मिळाले का, असा प्रश्न श्रीकृष्णाने त्याला विचारला तेव्हा त्याचे उत्तर ‘होय’ असे अर्जुनाला देता आले नाही. 

त्याने उगाच काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून उत्तर दिलेले आहे अन शेवटी स्पष्ट सांगून टाकले आहे की, "माझे अज्ञान काही दूर झालेले नाही; पण हा, मोह मात्र दूर झालाय. !!!

मग हे त्याचे उत्तर सुधारीत करून घेऊन श्रीकृष्णाने अर्जुनाची अशी समजूत घातली की, 

‘कोणताही मोह दूर होणे म्हणजेच अज्ञान दूर होणे होय.’ 

कुरुक्षेत्रावरचे प्रसंग केवळ अर्जुनाच्या आयुष्यात नसून ते प्रतिकात्मक रित्या पाहायला हवेत !!

पहा बरं - 

सीमोल्लंघन केवळ वीर पांडव, ईतर महापुरुष यांनीच केलेले नाही. !!

तर तुमच्या आमच्या जीवनात रोजच सीमोल्लंघन आहे. !!

प्रचंड कष्टाला सामोरे जाऊन जीवन जगणारे प्रत्येक देशात जवळ जवळ ७६ % लोक आहेत. 

ते देशात त्यांची लढाई रोज कुरुक्षेत्रावरच लढत आहेत. 

काही हरत आहेत, काही कधीतरी जिंकत आहेत. हे कुरुक्षेत्र सामान्य माणसाच्या वाटयाला तर कायमचे आलेले आहे.!!

अर्जुनाला श्रीकृष्ण तरी भेटला; पण ईतर कष्टकरी माणसाला त्याच्या प्रश्नाची उत्तरे मिळवण्याकरिता कोणताही श्रीकृष्ण रोज भेटणार नाहीये  ... त्याच्या रोजच्या जीवनातील न संपणारी लढाई लढताना थोडा का होईना विरंगुळा मिळावा म्हणून अशा सणांची योजना टप्प्याटप्प्यावर ईतिहासकरांनी केलेली असू शकते !! 


येणारे सण हे, जीवनातल्या सर्व दु:खांना सामोरे जात असताना, असे वर्षभर येऊन मनाला जगण्याची उमेद देत असतात. 

जसे शमीपत्राला सुवर्णपत्र समजून आजच्या दिवशी ज्याच्या आयुष्यात सुवर्णाचा संबंध नाही, तोही सुवर्णमय होतो. 

हा त्या दिवसाचा, त्या सणाचा महिमा आहे. अशा या सणांमुळे सामाजिक मनही अतिशय समृद्ध होत जात असते.

सामाजिक जीवनाला एकत्रित ठेवण्याकरिता, भारतात तरी असे टप्प्याटप्प्यावर आलेले सण विविध नावांनी साजरे करताना त्याच्या विविधतेमधील एकता ही सगळयात मोठी शक्ती मानली गेली आहे... तिचे संवर्धन झाले पाहिजे ...  

आजच्या सीमोल्लंघनाचा अर्थ व संदर्भ हा अनादि पौराणिक काळात जसा होता तसा शस्त्र हाती घेऊन बाहेर पडण्याचा नसून आजच्या सामाजिक विस्कटलेल्या चौकटी पुन्हा सांधण्याचा दिवस म्हणून पाहण्याचा आहे .... 

*आजच्या काळातील खरे शस्त्र हे *नॉलेज आहे* ... 

ते आपल्याकडे प्रसन्न होऊन येऊ लागताच आपण आपोआप प्रामाणिक अन नम्र होत जातो .. 

त्याचीच आराधना करण्यात आज सुख, आरोग्य, सौख्य अन संपत्ती सामाविलेली आहे !!

म्हणून त्याला धार लावून कायम तळपत ठेवले पाहिजे.. !!

तर अशा या जबरदस्त शस्त्राची जए सर्वांना easily available आहे, त्याच पूजा केली म्हणजेच भक्तीभावाने शिकत राहिले, ज्ञान अर्जित करत राहिले तर त्याचा खूप फायदा होतो आणि नंतर आपोआपच चोहिकडून आनंद, आरोग्य व संपत्ती येऊ शकते... 

विविकानंद म्हणून गेले होते - यशश्री त्यालाच माळ घालेल जो अभ्यासाने जिद्दीने अन कष्टाने तिला आपलेसे करेल, प्रसन्न करेल!!

बाबसाहेबांचे प्रसिद्ध वाक्य आहेत - शिक्षण वाघीणीचे दूध आहे, जो पितो तो डरकाळी फोडल्याशिवाय रहात नाही..

असो, 

सर्वांना याही वर्षी नवीन काहीतरी संकल्प करून, 

आर्थिक नॉलेज वाढवून, त्याला वास्तवात आणून, 

अभ्यासाच्या कक्षा विस्तारून खरे सीमोल्लंघन करण्याच्या शुभेच्छा !!!!


सुंद रूप गणारायांचे !!!


पुढील पोस्ट:-

OTT Awards!