'ऑपरेशन अजय' ची दुसरी विजयी कहाणी..

साधा माणुस...

'ऑपरेशन अजय' ची दुसरी विजयी कहाणी :-

Operation AJAY - First Batch to India

भारताने इस्राईल मध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना स्वदेशी बोलविण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू केले आहे हे आपण जाणतोच ... त्या अंतर्गत दुसऱ्या ग्रुपला सुद्धा भारतात पाठविण्यासाठी तिकडून विमान निघाले आहे ..!  
 
इस्राईल आणि हमास मध्ये १ आठवड्यापासून सुरू असलेल्या भीषण भडक्याने आणखीन जास्त पेट घेऊन अजून नुकसान होण्याआधीच प्रत्येक देशाने त्यांच्या नागरिकांना तिथून सुरक्षितपणे स्वदेशी बोलविण्यास सुरुवात केली आहे .. तेथील वणव्यात आत्तापर्यंत २९०० लोकांचा मृत्यू झालेला असून त्यात ८५० हून अधिक बालकांचा समावेश आहे.. 
 
भारतासाठी चांगली बातमी म्हणजे ऑपरेशन अजयच्या अंतर्गत पहिला जथ्था शुक्रवारी येऊन पोहोचला होता.. लगोलग दूसरा ग्रुप सुद्धा भारतीय भूमीवर पुढील ८ तासात पोचेल अशी अपेक्षा आहे .. .
 
स्थानिक वेळेनुसार ११:०२ च्या सुमारास तेल अविव मधून दुसऱ्या ग्रुपला घेऊन विमान रवाना झालेले आहे ..
राजकीय अधिवासाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यात २३५ भारतीय आहेत ज्यांमध्ये २ नवजात बाळ आहेत.. 
 
Operation AJAY - Second Batch to India

भारतीय दूतावास अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या खेपेसाठी तैयार राहण्याचे ईमेल पुढील ग्रुपला केले गेले आहेत ..

भारतीय दुतावासाचे आभार:
इस्राईल मधील सफेड शहरातील ईलान विद्यापीठात डॉक्टरेट करणारे सूर्यकांत तिवारी दूतावास अधिकाऱ्यांना धन्यवाद देताना आंखो देखा हाल सांगतात ..

ते म्हणाले की, “मी जे पाहिले ते गेली ४ वर्षे जगातील सर्व धर्माचे व स्वभावाचे विद्यार्थी येथे मिळून मिसळून आनंदाने रहातात ... येथे चायनीज खालोखाल भारतीय विद्यार्थीसुद्धा बरेच आहेत.. विदेशी विद्यार्थ्यामध्ये घबराट निर्माण होऊ नये म्हणून विद्यापीठांनी लगेच मागील आठवड्यापासून सर्वांना एक्स्ट्रा सुविधा दिल्या होत्या..

इस्राईल आणि हमासचे युध्द हे फार दशकांचे जुने आहे त्यामुळे त्यांच्यासाठी ते नेहमीचेच आहे... परंतु पुढे आणखीन भीषण होऊ शकण्याऱ्या परिस्थितीची वाट पाहण्याऐवजी मायदेशी परतण्यासाठी विकसित देशांप्रमाणे भारताने देखील लवकर निर्णय घेतला या बद्दल त्यांनी भारतीय दुतावासाचे आभार मानले ..!
 
हमला का केला?

हमास ने त्यांची ३ कारणे सांगितली आहेत .

  1. जागतिक हेरिटेज मध्ये असलेल्या व मुस्लीम आणि ख्रिस्ती दोघांसाठी पवित्र असलेल्या अशा यरुशलेम मधील “अल-अक्सा मस्जिद” वर इस्राईल कडून एप्रिल २०२३ मध्ये हँडग्रेनेड फेकण्यात आला होता ...
  2. विविध शहरातील हमासच्या सपोर्टर्स असलेल्या ठिकाणांवर हमले करून ते बायका-मुलांसाहित नष्ट केले जात होते ..
  3. इस्राईल सेनेकडून हमास च्या स्त्रियांवर देखील अत्याचार केले गेले होते..

त्याचा बदला आम्ही घेत आहोत असे हमास चे वरिष्ठ गोटातील अधिकारी हनीया बारूम, अरुरी, ई यांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत सांगितले..

इस्राईल, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युरोपियन युनियन मधील, जपान, परागवे, इंग्लंड व अमेरिका यांनी हमासला टेररिस्ट संस्था म्हणून घोषित केलेले आहे ..
 

तेल अवीवमध्ये हल्ला होण्याचा सायरन काल अचानक वाजल्याने झालेल्या गाजापट्टीतील धावपळीत पुन्हा झालेल्या हल्ल्यात ७० लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे..   

(हा हल्ला इस्राईलने केला की हमास ने याबद्दल काही माहिती नाही)

इस्राईल सेनेच्या अनुसार त्यांच्या देशातील १३०० लोकांसाहित १९२ सैनिकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत ... व त्यांनी हमासच्या १५०० लोकांना ठार मारण्यात आले .. तसेच ११ लाख लोकांना गाजा शहर खाली करण्याचे आदेश दिले आहेत !!

दुसरीकडे पॅलेस्टाईन सरकारच्या स्वास्थ्य मंत्रालयानुसार इस्राईल च्या हवाई हल्ल्यात त्यांच्या देशातील मारल्या गेलेल्या लोकांची आकडेवारी ही १९०० असून त्यात ६५० लहान मुलांचा समावेश आहे .. त्यांनी सांगितले की १९४८ मध्ये जसे आम्ही निघून गेलो होतो आणि इस्राईल ने कब्जा केला होता तसे आता आम्ही होऊ देणार नाही... प्राण गेला तरी चालेल पण मागे हटणार नाही ... 


300 DEAD, ISRAELI PM NETANYAHU DECLARES ‘WAR’ AFTER HAMAS TERRORISTS LAUNCH MASSIVE ATTACK

विविध चॅनलवरच्या नुसत्याच फालतू चमकोगिरी सारखे न करता इस्राइल-हमास युद्धाबद्दल कर्नल बक्षी व लेफ्टनंट जनरल शुक्ला यांनी केलेले “अभ्यासू डिस्कशन” आपल्याला येथे पाहायला मिळेल ..!