अमेरिकेत मिलिटरी मॅनने केली एक्स्पर्ट अंधाधुंद फायरिंग .. 44 जागीच ठार .. 150+ जखमी Lewiston, Maine येथे

साधा माणुस...

अमेरिकेत मिलिटरी मॅनने केली एक्स्पर्ट अंधाधुंद फायरिंग .. पुन्हा एकदा ...44 जागीच ठार .. 150+ जखमी ...  



काल रात्री Lewiston, Maine येथील एका हॉटेल जवळील गल्ली मध्ये एक माथेफिरुने केलेल्या अंधा धुंद फायरिंग मध्ये 44 जण जागीच ठार झाले अन शेकडो हून अधिक जखमी आहेत .. डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे मृत्यूचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे .. Lewiston, Maine, हे एक Androscoggin County मध्ये असलेले, छान फ्रांस अमेरिकन वारसा असलेले, नॉर्थ पोर्टलँड पासून 40 - 50  किलोमीटर वर स्थित असलेले शांत शहर आहे !!!

कालच्या घटनेत काय झाले नेमके :

रॉबर्ट कार्ड हा चाळीशी मधील अमेरिकन, मिलिटरी मध्ये असलेला, उच्च ट्रेनिंग घेतलेला, अमेरिकन आर्मी मध्ये काम केलेला, अत्याधुनिक शस्त्रे चलविण्याचे बरेच परवाने असलेला, हल्लेखोर आहे .. ते समजताच सर्व सरकारी यंत्रणा चक्रावून गेल्यात अन सर्व सरकारी गुप्तचर संस्था, लोकल पोलिस, एफ बी आय, सर्वच जण त्याच्या मागे हात धूऊन लागलेले आहेत .. 

पुढील घटना हळूहळू समोर येतीलच ... 

अमेरिके सारख्या बलाढ्य देशाला लागलेली ती एक कीड आहे .. गेल्या 10 महिन्यात अमेरिकेत मास शूटिंग च्या 500 हून अधिक घटना .. म्हणजे दर दिवसाला दीड ते दोन घटना !!!

आणि म्हणूनच याला कीड म्हटले गेले आहे आणि ती का नसावी... ? 

हा देशच असा आहे की जो अतिशय जास्त प्रमाणात शस्त्रे manufacture करतो ... जगातील विविध टेरारिस्ट लोक, एकमेकांवर हल्ले करणारे देश, आतंकवादी संघटना यांच्याकडे सापडली जाणारी सगळी आधुनिक शस्त्रे ही 92 % अमेरिकनच असतात ... 

तमाम शस्त्रे तैयार करून ती वैध अवैध मार्गाने जगभरात पोहोचविणे हेच तर अमेरिकेचे मुख्य काम आहे ... मग अशा देशात स्वत च्या गल्लीबोळात अत्याधुनिक बंदुकी व त्याला लागणाऱ्या बुलेट्स किलो किलोने मिळतात ही गोष्ट जगमान्य आहे  !!!!

न्यूयॉर्क सहित बऱ्याच शहरात तर काही ठिकाणी संध्याकाळ झाली की लोक काय पोलिस सुद्धा जायला घाबरतात..  आधुनिकतेने पैसा अति प्रमाणात आलेला आणि त्यामुळे कार्य शक्ती कमी होऊन नुसते स्वैराचारी जीवन येथे पाहायला मिळते ... तसेच दुसरी बाजू म्हणजे अतिशय घाणेरड्या वस्त्या सुद्धा पाहायला मिळतात .. श्रीमंत अन गरीब दरी जास्त प्रमाणात जिथे असते तिथेच गुंडागिरीचे भयाण स्वरूप असते ... 

मास शूटिंग हे एक epidemic सारखे अमेरिकेत पसरलेले पाहायला मिळते .. घडणाऱ्या प्रत्येक घटनेने सर्वसामान्य कॉमन मॅन सुन्न होत राहतो .. "नेहमीच मरे त्याला कोण रडे" विचारसारणी असलेले भयानक लोक सुद्धा पाहायला मिळतात सध्या .... 

तिथे विव्हळत असलेले, रडत असलेले, जखमी, बेशुद्ध असलेल्या लोकांचा खच पडलेला होता .. क्षणभर डोके सुन्न होत होते पाहणाऱ्यांचे .... काय आणि किती शोक व्यक्त करणार ? 

खरे दुर्दैव असे आहे की सरकार याकडे अतिशय निर्ढावल्याप्रमाणे पहाते कारण बंदुकी, गोळ्या, हँडग्रॅनड, स्वयंचलित अत्याधुनिक बंदुकी रस्तोरस्ती त्यांच्याच वरदहस्ताने आलेल्या असतात ही सर्वांना ठाऊक आहे ... 

जनतेच्या वाढत्या दबावामुळे सरकारला जबाब द्यावाच लगेच परंतु तो कधी मिळेल तो मिळेल पण तोपर्यंत दुर्दैवाने कॉमन मॅन असेच मरत राहतील ... 

पुढे वाचा:-

Shah Rukh Khan's new movie Dunki to release on December 21, 2023