जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी.... एल. आय. सी. चे घोषवाक्य..!!!

साधा माणुस...
जिंदगी के बाद भी  जिंदगी के साथ भी.... एल. आय. सी. चे घोषवाक्य..!!!   

खरेच  एल. आय. सी. या घोषवाक्याप्रमाणे सर्वच बाबतीत प्रामाणिक आहे का..?
 की निव्वळ फसवेगिरी आहे..???
चला पाहू..! त्या आधी काही इतर खरी माहिती घेऊयात..!
जागतिक आरोग्य संघटना (वर्ल्ड हेल्थ ओर्गानायाझेशन) ने सांगितल्या नुसार एकूण हृदयरुग्ण पैकी ६०% लोक हे भारतात आहेत.. !
आणि २०१५ पर्यंत जर काही केले नाही तर आख्या जगात असणा-या एकूण हृदयरुग्ण पैकी ५०% पेशंट हे भारतात असतील..!
या नंतर जगात तंबाकू, गुटखा, आणि धूम्रपानाने होणा-या  मृत्यूपैकी भारतात सर्वात जास्त मृत्यू होतील..!!!!!
ही माहिती अतिशय धक्कादायक आहेच परंतू जर खरा शोध घेतला तर या घाणेरड्या वस्तूंचे उत्पादन करणा-या कंपन्यांच्या मुळाशी जाता येईल..!!!!

आता नुकत्याच उघडकीस   आलेल्या खालील बाबी पहा:- 
१. भारतात क्रमांक २ ची नार्कोटिक्स उत्पादक आणि निर्यातदार कंपनी आहे आय.टी
.सी (हीच कंपनी जगप्रसिद्ध सिगारेटचे ब्रान्ड बनविते, उदा. विल्स, नेव्ही कट, ई..) या कंपनी मध्ये पैसा पुरवणारे गुंतवणूकदार अतिशय पैसेवाले हवेत.. जेणे करून त्यांना जागतिक बाजारात पाय रोवून उभे राहता येईल..   एल. आय. सी.(भारतीय आयुर्विमा महामंडळाने )ने या कंपनीत ३३६६ हजार कोटी - 3366,0000000 रुपये गुंतवलेत..! (म्हणजेच ६ बिलियन अमेरिकन डॉलर्स ..!!!!!)

 २. धर्मपाल सत्यापाल लिमिटेड मध्ये  एल. आय. सी.ने पन्नास कोटी - 50,0000000 रुपये (म्हणजे 1० मिलियन अमेरिकन डॉलर्स..!!) हीच कंपनी तुलसी, रजनी गंधा आणि इतर नामांकित (?) गुटखा बनविण्यात आघाडीवर आहे...! 

३. व्ही.टी. सी. मध्ये एल. आय. सी.ने अशीच छातीत धडकी भरायला लावणारी गुंतवणूक केली आहे....

वरील तीन सत्यं वाचून कोणी असेही म्हणू शकेल की एल. आय. सी.ने स्वत: कुठे या घाणेरड्या वस्तूंचे प्रोडक्शन केले आहे .. ??????
पण कितीही म्हटले तरी सत्य परिस्थिती ही असते की कोणतीही मोठी कंपनी ही नेहमी करून मोठ्ठ्या गुंतवणूकदारांवर अवलंबून असते..!
आणि भारतात वाढत जाणा-या जीवघेण्या लिव्हरचा, तोंडाचा, फुफुस्साचा क्यान्सर आणि हृदयरोग  या सगळ्या रोगांना हीच गुंतवणूकदार मंडळी कारणीभूत आहेत हे सूर्य प्रकाशाइतके सत्य आहे..!

आता एल. आय. सी मध्ये जर आपल्याला पोलिसी काढायची आहे तर काय निकष आहेत..?
१. आपली हेल्थ चांगली हवी...
२. मेडिकल टेस्ट मध्ये आपण उत्तीर्ण व्हायला हवे..
जर तुमची इन्सुअरड अमाउंट आठ आकडी असेल म्हणजे तुम्हाला एक कोटीचा विमा उतरवायचा असेल तर तुम्ही वरील सगळ्या रोगांपासून मुक्त असला पाहिजे..! त्याची मेडिकल टेस्ट अतिशय कडक घेतली जाते... अन्यथा तुमच्या प्रिन्सिपल अमाउंटची रक्कम दुपटीने जास्त असू शकते...!!
:-)
म्हणजे एकीकडे वाघ वाचावा म्हणून मोर्चा काढायचा आणि दुसरीकडे वाघांची शिकार करायला मोठ्ठ्या मोठ्या रकमांच्या स्पर्धा आयोजित करायच्या..!!!!! 

सगळ्यावर कडी म्हणजे  सरकारने एलआयसीविरुद्ध कारवाई करण्यास नकार दिला...!!!! या पेक्षा आपले दुर्दैव कोणते..?