परिवर्तनवादी व्हा..!!!

साधा माणुस...
जर तुम्हाला गटार व्हायचे नाहीये, खळाळता निर्झर व्हायचे असेल तर..... परिवर्तनवादी
व्हा..!!! 
ते म्हणतात ना, जगात जर काही कायम रहाणारी गोष्ट असेल तर ती आहे "बदल"...!!! 
बदल ही एकच कायम रहाणारी, चिरंतन, चिरकाल टिकणारी गोष्ट आहे..! 
खळाळता निर्झर जर आपली लयबद्ध ताल आणि पुढे जाणे विसरून धीरगंभीरपणे, एकाच जागेवर भाळून,  स्थिर होऊन तिथेच थांबला की त्याचे तुंबलेले गटार व्हायला वेळ लागत नाही हे आपण जाणतोच....!
         
याच न्यायाप्रमाणे जर आपण जुन्या रूढी ज्या आजच्या काळात निष्क्रीय झाल्या आहेत त्या गोंजारत बसलो तर आपलेसुद्धा तेच हाल होणार..! 
आजच्या परिवर्तनवादी युगात जर आपण एव्हढी एक गोष्ट जरी शिकलो तरी खूप काही मिळवले असे म्हणता येईल..!  
परिवर्तन होताना ते वाईट दिशेने न जाता आपल्या स्वताची आणि अनुषंगाने समाजाची उन्नती होईल याकडे दिशेने अत्यंत सावधतेने होईल याकडे लक्ष दिले पाहिजे..! 

एक गोष्ट ऐकवतो..!!!
लक्ष्मणरावांनी तरुणपणी "सरस्वती टायपिंग सेंटर" हे ३० वर्षांपूर्वी लोकांचा विरोध धुडकावून सुरु केले.... टायपिंगचा तो सुरुवातीचा काळ होता त्यामुळे लोकांचा विरोध होता...तो हळू हळू मावळून त्यांचे सेंटर अतिशय लोकप्रिय झाले.. तेजीत चालले आणि इतक्या वर्षांमध्ये नावाजलेलेही झाले.. आय.टी च्या जमान्यात टायपिंग सेंटरला अवकळा येणार हे त्यांनी अचूकपणे हेरले होते..! 
त्यांनी दूरदृष्टी दाखवून त्यांच्या मुलांना संगणक शिकविला आणि स्वताहून टायपिंग सेंटरच्या २५ व्या वर्धापन दिनी "न्यू व्हिजन इन्फोर्मेशन टेक्नोलोजी" नावाने संगणक संस्था सुरु सुद्धा केली...!!!!
काळाची पावले ओळखून स्वताला त्या दिशेने नेले..  !!! 
आणि या परिवर्तनाने त्यांना चांगलाच फायदा  झाला... त्यांच्या नावाजलेल्या सरस्वती टायपिंग सेंटरचे जवळ जवळ सर्वच विद्यार्थी त्यांच्या संगणक संस्थेला आयतेच मिळाले..!
आता आणखी एक गोष्ट .....
दिनेश अभ्यासात हुशार नव्हता पण रेडीओ, टीव्ही, व्ही.सी.आर दुरुस्ती जिद्दीने शिकून त्या मध्ये त्याने प्राविण्य प्राप्त केले होते आणि स्वताचे दुकान थाटले होते... 
तेव्हा मोजक्याच दहा बारा कंपन्यांचे रेडीओ  टी.व्ही. मिळत असत आणि ते सर्व दिनेशला रिपेअर करता येत असत त्यामुळे तो त्या परिसरात चांगलाच लोकप्रिय झाला..  पाच वर्षांत तो चांगला नावाजलेला झाला... निश्चिंत झाला..!!!
जागतिकीकरणाचे वारे हळू हळू देशात घोंघावू लागले होते.. भरपूर नव्या नव्या कंपन्या भारतात येऊ लागल्या आणि दिमाखात नवीन टेक्नोलोजी आणू लागल्या... उदा. टी.व्ही मध्ये एल.सी.डी., फ्ल्याट स्क्रीन, प्लाझ्मा, एल.ई.डी, डी.व्ही.डी., इ..   दिनेश सुद्धा या भारतात येणा-या कंपन्यांना नावे ठेवत असे... कारण तो अगदी निश्चिंत झाला होता, चांगला कमावता होता,  त्यामुळे परिवर्तनाची चाहूल लागून सुद्धा त्याने कधी गंभीरपणे पाहिले नाही... स्वताच्या विश्वात मश्गुल असल्याने तो त्याच्या कोशातून बाहेर यायला तयार नव्हता.. !!!
नवीन टेक्नोलोजीचे रिपेअरिंग येत नसल्यामुळे तो नव्या नव्या डिजिटल टेक्नोलोजी ला नावे ठेवू लागला.. परिणामी त्याचा नकार ऐकून हळू हळू गि-हाइक येणे बंद झाले... मोजून दहा वर्षात त्याचे दुकान बंद झाले आणि तो समजूही शकला नाही की असे का व्हावे..? 
शेवटी तो नशिबाला दोष देत बसला..! 
दिनेश चे पाहून त्याच्या एक मित्राने - सुहासने सुद्धा स्टोव्ह रिपेअरिंग चे दुकान सुरु केले होते.. ते देखील दहा वर्षे व्यवस्थित चालले ... पण नंतर धडाधड आणि स्वस्तात ग्यास कनेक्शन मिळू लागले होते तर लोकांच्या घरातील स्टोव्ह माळ्यावर जाऊन बसू लागले... मध्यमवर्गीय तर सोडाच पण झोपडपट्टीमध्ये सुद्धा एल.पी.जी चे कनेक्शन नाहीतर गोबर ग्यास येऊन पोहोचला.. !!!!
दिनेश प्रमाणेच जुन्याला चिकटून बसल्यामुळे सुहासला सुद्धा दुकान बंद पडेपर्यंत याचा पत्ता देखील लागला नाही.. !!! 
सारांश काय........?????
....तर आपण सगळ्यांनीच या जागतिकीकरणाच्या लाटेमध्ये टिकून राहण्यासाठी काय नवीन स्कील अंगिकारले पाहिजेत आणि टिकून कसे राहता येईल हे पाहिले पाहिजे ..!  
या जागतिकीकरणाच्या मोहात अडकता कामा नये आणि नवीन परिवर्तनाला नाकही मुरडता कामा नये...
कारण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही..! नवीन स्विकारण्यामागील विधायक भावना, फायदे, तोटे सगळे एक पूर्वग्रह दुषित दृष्टीकोन न ठेवता बघायला हवे..!  निकोप दृष्टीने पाहिले तरच खरे फायदे कशात नि तोटे कशात हे समजेल..!!!
या इंटरनेटच्या काळात, वैश्विक खेड्यात, ग्लोबल व्हिलेज मध्ये जगताना आपण आणि आपले स्कील हे जुनाट तर होत नाहीये न..? याची काळजी प्रत्येकाने घेतलीच पाहिजे..!!!!
जाऊ दे बे ... काही होत नाही, जे होईल ते पाहून घेऊ नंतर .. असे म्हटले तर परिवर्तनाचा झंझावात मस्त दणका देऊन आपले कंबरडे मोडून जाईल यात शंका नाही..!!!!.  
परिवर्तनाची दिशा युवाशक्ती बरोबर विधायक मार्गानेच न्यायला हवी.. आपण नुसते "ओल्ड इज गोल्ड" घोकत राजेश खन्नाच्या गाण्यांनाच कुरवाळत बसलो तर नवीन पिढी "चढती जवानी मेरी चाल मसतानी" चे फालतू रिमिक्स, "शीला की जवानी" आणि तत्सम गाण्यांच्या चालींवर घाणेरडा नाच पहात बसणारच.. !!!
परिवर्तनाला वेळीच ओळखून, जोखून, समजून घेऊन विधायक मार्गाने नेले नाही तर ते आपल्या युवा तरुण पिढीचा विकृत मार्गाने घात करणार यात शंकाच नाही.. !!!
आणि तेव्हा वेळ निघून गेल्यावर स्वताची जबाबदारी झटकून "नवी पिढी अगदी वाया गेलेली आहे" अश्या टीका करण्याशिवाय ज्येष्टांपुढे दुसरा पर्याय राहणार नाही..!

येणा-या नवीन वर्षाला साक्षी ठेवून चला स्वत: मध्ये बदल घडवूया... !
आणि आजपासून परिवर्तनवादी होण्यासाठी स्वताला तैयार करूयात..!!