तिची इच्छा घाव प्रत्येक, ताजा हिरवाच रहावा.......

साधा माणुस...
पानगळ....

मनाच्या उजाड़ ग्रीष्मात, एकदा तरी बहर यावा,
तिची इच्छा घाव प्रत्येक, ताजा हिरवाच रहावा !

पानगळीच्या पानांनी, तिच्या स्मृति जागवाव्या,
वादळापूर्वी झाडाने फांद्या सगळ्या झाडाव्या !!


प्रेमानं दरवळणा-या वसंतात, फुल-सुगंध होतो कधी,
धुळीने माखलेल्या पायवाटेवर , फुलांचा पाचोळाच रहावा ?

गंधाळलेल्या आठवणी मनाने, किती किती जपाव्यात,
हळुवार जपलेल्या पाकळ्यान्चा, हृदयावर व्रण रहावा !!


त्याच आठवणी पुन्हा नव्याने, का तिने चेतवाव्या,
ओरबाडत खोल जखमांना, एक एक सल जागवावा ?

का देतेस फसव्या त्या, पुन्हा पालविच्या संवेदना,
सवय वणव्याची होतानाच, परिमल दरवळावा...

.
..
...
जमीर इब्राहीम 'आझाद'