जेव्हा आमीर खान पुण्याच्या अन मराठीच्या प्रेमात पडतो !!
एफ.टी.आय.आय (FTII Pune) ही जागतिक दर्जाची, भारतातील नंबर 1 वर असलेली, आणि सर्वात जुनी तंत्रज्ञ आणि कलाकार तैयार करणारी जबरदस्त संस्था आहे हे आपण जाणतोच ... आमीर खान जेंव्हा येथे शिकायला येतो तेव्हा काय काय गंमत होते ...
FTII च्या अडचणी सोडविण्यासाठी त्याने डायरेक्ट दिल्ली पर्यन्त धाव घेललेली आपल्याला माहिती असेलच !!!
![]() |
The Perfectionist - Aamir Khan |
त्या बद्दल त्यामागचे कारण विचारण्यासाठी त्याला पुण्यातील दिवसांबद्दल विचारले असता त्याने रम्य आठवणी सांगितल्या ...
त्या त्या प्रांतातील कलाकाराला न्याय देण्यासाठी मी आजवर कायम विविध भाषा शिकलो ...
रंग दे बसंती साठी पंजाबी अन सोबतच 'गुलाबो' कडून अस्खलित फ्रेंच शिकलो,
पी के साठी मारवाडी, राजस्थानी शिकलो अन भोजपुरीही शिकलो,
दंगल साठी हरियाणवी शिकलो ,
बंगाली शिकलो तसेच विविध परकीय भाषा सुद्धा शिकलो ...
मला सांगायला अभिमान वाटतो की या सर्व भाषांमध्ये मी संभाषण करू शकतो !!!
परंतु या सर्व भाषयांहून सरस मला जी आवडते ती आहे "माझी मराठी" !!!
एफ.टी.आय.आय येथे दिलीप कुमार, देव आनंद, शत्रुघ्न सिन्हा, ऑस्कर विजेते रसूल पोकूट्टी, जया-अमिताभ, नसीरउद्दीन, मिथुन, शबाना आझमी, राजकुमार राव, संतोष शिवन, गिरीश कर्नाड, मणी कौल, अदूर गोपालकृष्णन ही काही नावे ... सर्व नावे लिहायला एक वेगळी पोस्ट लिहावी लागेल !!!! (स्वत: गुगल करावीत ;-))
तर सांगायचे म्हणजे - हे सर्व जेंव्हा जेंव्हा पुण्यात यायचे किंवा अजूनही येतात तेव्हा येथे आवर्जून भेट दिल्याशिवाय जात नाहीत .. जुन्या गोल्डन डेज ला आठवणे ही सर्वांसाठी पर्वणीच असते कायम ...
तर या ठिकाणच्या आमीर खान च्या सुद्धा तशाच सुंदर व अप्रतिम अशा बऱ्याच आठवणी आहेत..
त्याविषयी त्याला विचारताच तो लगेच नॉस्टाल्जीक होतो .. चेहऱ्यावर एक निरव्याज हसू येते आणि तो रम्य आठवणींमद्धे गुंतून जातो ...
स्वत:ला सावरत लगेच म्हणतो देखील की -
"पुण्यातील ते दिवस माझ्यासाठी खूप जादुई होते .. एक आर्टिस्ट म्हणून, तंत्रज्ञ कलाकार म्हणून, आणि एक माणूस म्हणून देखील ! माझ्यातील perfectionist म्हणून जो कुणी असेल तो तैयार व्हायला पुण्यातील त्या रंगीबिरंगी दिवसांची फार मोलाची कामगिरी आहे !!!
पुढे सांगताना तो म्हणतो - , "नुसत्याच रंगीबिरंगी दिवसांची नाही तर अभ्यासू, जिद्दी अन दुसऱ्या दिवशी डायलॉग बोलताना फजिती होऊ नये म्हणून रात्र रात्र जगून केलेल्या पाठांतरची, ते कसे करावे हे शिकविणाऱ्या तमाम शिक्षकांची आणि सोबत असलेल्या साथीदारांची !!!!
मराठी मला आवडू लागली ते पुण्यामुळेच ..
मुंबईमध्ये हिंदी मिक्स मराठी बोलली जाते तर पुण्यात शुद्ध मराठी ...
ज्यात मला रस वाटू लागला आणि मी जिद्दीने शिकलो सुद्धा ... पुढे मला याचा काम करताना फार उपयोग झाला .. अजूनही होतो आहे ...
मला जेंव्हा स्वत:मध्ये काहीतरी कमतरता आहे असे भासते तेंव्हा तेंव्हा आजही मी पुण्याला चक्कर मारतोच मारतो !!!
अर्थात कुणाच्याही नकळत करतो हे सर्व ... अन्यथा लगेच गर्दी जमा व्हायला सुरुवात होते...
पुण्यातील आठवणी सांगताना तो सांगतो की गुडलक, दोराबजीज, एफ सी रोड, खडकवासला डॅम, सिंहगड किल्ला येथे त्याच्या असंख्य रम्य आठवणी आहेत !!!