वेड शांत झाले ...!

साधा माणुस...
वेड ... साध्या माणसाला जर लागले... तर काय होऊ शकते..?
तो ज्या गोष्टी ला हात लावेल त्याचे सोने होऊ शकते....
काहीच गरज नाही परिस शोधत बसण्याची... कारण अशी माणसे ही परिस असतात...

स्वताच्या अस्तित्वाने आजूबाजुचा परिसर दरवळत ठेवतात... उजलुन टाकतात....
असाच होता तो साधा माणूस...!
गाईड, ज्वेल थीफ, बाजी, जोनी मेरा नाम, हरे रामा हरे कृष्णा, सी आय डी या चित्रपटांचा नायक..
खरा चोकलेटी नायक..!!!
तो ८८ वर्षे का जगाला..?? हा प्रशन जेंव्हा आम्हाला पडतो..
तर उत्तर एकाच येते... आणि ते म्हणजे...
तो शेवट पर्यंत तेच करत होता जे त्याला आवडत होते..!!!!
स्वताच्या आवडीच्या क्षेत्रात मनापासून झोकुन देणे या वयात सुद्दा त्याला शक्य होते कारण त्या आवडीवर असणारी त्याची श्रद्धा, आत्मविशास आणि दुर्दम्य उत्साह ..!
त्याचा दुर्दम्य उत्साह आणि नेहमी असणारी आनंदीवृत्तीसाठी तो कायमच आमच्या स्मरणात कोरला गेला आहे..!!!
वय ८८ पण उत्साह आणि आनंद १६ वर्षांइतका.. !!!
कायम वर्त्तमानकाळ समोर ठेवून जगणे हेच त्याच्या उत्साहाचे रहस्य होते..!
जे भल्याभल्या साधू बाबा लोकांना आजसुद्धा जमत नाही..!!  नुसते भक्तीचा बाजार जमवून स्वताला गुरु म्हणवुन  घेतात आणि भोळ्या लोकांना लुटत रहातात..!
देव आनंद कडून आपण त्याची श्रद्धा, आत्मविशास,  दुर्दम्य उत्साह .आणि वर्त्तमानकाळ समोर ठेवून आनंदाने जगणे हे जरी घेतले तरी रोजचे जगणे सुलभ होइल...!!