मेणबत्ती पेटवून काय मिळविणार. ...??? नुसती पोकळ देश भक्ती..???

साधा माणुस...

२६/११ च्या दुर्दैवी हल्ल्याला खरा भारतीय कधीच समर्थन देणार नाही.. !!!!
परंतु त्या हल्ल्याला ३ वर्षे होऊन सुद्धा सरकार अत्याधुनिक शस्त्रे, जाकेट्स, बुलेटप्रूफ गाड्या, सर्विलेंस वेहीकल्स या सेन्सिटीव आणि अतिशय महत्वाच्या विषयांसंदर्भात निर्णंय घेण्याबाबत इतके ढिम्म कसे...?
आणि सगळ्या "ताजा खबर" वाहिन्या शांत कश्या..???
का..?
कारण अश्या न्यूज ना टी.आर.पी मिळणार नाही म्हणून..???
काही लोक ग्रुप करून शनिवार वाडागेट वे ऑफ इंडिया, इंडिया गेट अशा ठिकाणी  जाऊन अतिशय उत्कट भावनेने, सदगदित होऊन मेणबत्त्या पेटवतात आणि हे दृश्य आपल्याला वारंवार पहायला मिळते.. .!!!

ते पाहून आम्ही सुद्धा नतमस्तक होतो..!!!
शनिवार वाड्यात आमच्याही डोळ्यात आपोआप अश्रू आले... !!!
मनात दृढ निश्चय आला, भारतीय असल्याचा अभिमान उफाळून आला आणि देशासाठी लढणा-यांचा जास्तच अभिमान वाटू लागला..!!!
दुस-या दिवशी शनिवार वाड्याहून जाताना सहज पहिले तर ४-५ जीर्ण कपडे घातलेली मुले त्या सगळ्या जळलेल्या मेणबत्त्यांचे मेणगोळा करत होती...
सहजच म्हणून एकाला हटकले... तर तो घाबरला... सगळी मुले १० ते १३ वयोगटातील होती..
मग प्रेमाने सगळ्यांना जवळ बोलावले आणि विचारले कि काय करत आहात..?
त्यांनी सांगितले कि हे वितळलेले मेण गोळा करून पुन्हा आमच्या वाडीच्या कंपनीत नेणार जिथे मेणबत्त्या बनवतात आणि आम्ही ते मेण त्यांना विकणार.. !!! या सगळ्या दीड - दोनशे मेणबत्यांचे वितळलेले मेण विकून ५० ते ६० रुपये नक्कीच येतील..!!!!!

:-(

आमच्या काळजात चर्र झाले ..!!!!

काल जो देशाभिमानाचा जो माहोल होता......तो आत्ता कुठेच दिसत नव्हता..!!!!...
काल येऊन मेणबत्त्या पेटविणारे, 
रस्त्याने येणारे जाणारे,
अगदी अलिप्तपणे, तुच्छपणे माझ्याकडे आणि त्या गरीब मुलांकडे पाहत होते..!!!!
डोक्यात एक विचार आला... 
कि खरेच काल जे झाले...
मेणबत्ती पेटवून मानवंदना देणे. इ.इ.ते बरोबर होते का..????
आणि अश्याने काय होणार आहे..??????
अगदी ३-४ वर्षापूर्वी तर ही पद्धत आपल्या देशात नव्हती.. ..!!!!
मग ही प्रथा आपल्याकडे कशी आली..??????
की सगळ्या सो काल्ड "ताजा खबर" चानेलवाल्यांमुळे परदेशी संस्कृती इकडे सुद्धा येऊ पाहते आहे..????
सहजच अंतर्मुख झालो.. 
आणि...
विचार आला ... 
खरेच आपण जर आजच्या या कोवळ्या मुलांकडे फक्त अलिप्त पणे हातावर हाथ ठेवून  पाहणार आहोत तर ....
मेणबत्ती पेटवून काय मिळविणार. ...???
काल काय जोरदार घोषणा देत,  रस्ताभर 
"अण्णा, अण्णा, आगे बढो हम तुम्हारे साथ है...
मी भी अन्न तू भी अण्णा
अब तो सारा देश है अण्णा...
.. असे म्हणून  तरुणाई रस्त्यावर उतरली होती... थोडा वेळ छान वाटली.. परंतू नंतर यातील ९०% तरुणाई नंतर अचकट विचकट चाळे करीत होती,  गुटका खाऊन रस्त्यावर थुंकणे, साधा सिग्नल पाळणे किंवा झेब्रा क्रोस्सिंग वर गाडी उभी न करणे इतके साधे नियम सुद्धा जर आपण पाळणार नसू तर काय अर्थ आहे आपल्या या पोकळ मोर्चा काढण्याला..??? 
याला काय म्हणायचे ...?
नुसती पोकळ देश भक्ती..???
कि "ताजा खबर" वर स्वताला झळकावून घेण्याचा आनंद..???:-( 
खरेच आपण  अण्णा हजारे यांना मदत करीत आहोत कि आपली हिडीस आणि विकृत हौस भागवून घेत आहोत याचा विचार करणे जरुरीचे आहे...!!!